*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश*

*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश*

*कोंकण एक्सप्रेस*

*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश*

*वेंगुर्ला : प्रतिनिधि*

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दिनांक 12 जानेवारी २०२५ रोजी पार पडली.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचे दोन विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले आहेत.त्यामध्ये कु.तनिषा मनिष सातार्डेकर हीने ९० गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात इंग्रजी माध्यमातून इयत्ता पहिली तून प्रथम क्रमांक व संपूर्ण देशात 87 वा क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच कु.श्रेयांश सचिन सावंत हा ९३ गुण मिळवून तालुक्यात इंग्रजी माध्यमातून इयत्ता तिसरी तून प्रथम आला आहे. व संपूर्ण देशात त्याने 55 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख,संचालक श्री. प्रशांत नेरुरकर, सचिव श्री.दत्तात्रय परुळेकर ,मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोजा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!