*गुणिजनांनी त्यांच्या क्षेत्रात मानवी मूल्यांच्या जतनाची चळवळ उभी करावी – डॉ. सुनिल सावंत*

*गुणिजनांनी त्यांच्या क्षेत्रात मानवी मूल्यांच्या जतनाची चळवळ उभी करावी – डॉ. सुनिल सावंत*

*कोंकण एक्सप्रेस*

*गुणिजनांनी त्यांच्या क्षेत्रात मानवी मूल्यांच्या जतनाची चळवळ उभी करावी – डॉ. सुनिल सावंत*

*प्रा.अक्षता मोंडकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका विद्यारत्न नारी गौरव पुरस्काराने सन्मान*

*शिरगांव : संतोष साळसकर*

मानवी मूल्यांचे जतन करणे हे आधुनिक जगापुढील फार मोठे आव्हान आहे. पुरस्कार मानकरी गुणिजनांनी त्यांच्या क्षेत्रात मानवी मूल्य जतनाची चळवळ उभी करावी. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या या गुणिजन संस्थेचा मला सार्थ अभिमान वाटतो.असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनिल सावंत यांनी मुंबई येथे व्यक्त केले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा २७ मार्च रोजी दादर येथील मांगल्य सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२५ आणि राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा सुप्रसिद्ध साहित्यीक डॉ सुनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला. पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!” या ब्रीदवाक्यावर कार्यरत असलेल्या या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरही पुरस्कार उपक्रम राबविण्यात येत आहेत.
देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता हरिश्चंद्र मोंडकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका विद्यारत्न नारी गौरव पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यस्तरावर विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय योगदान दिलेल्या ५१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थेचे संस्थापक अँड. कृष्णाजी जगदाळे, साहित्यिक नंदू सावंत, सायबर सुरक्षा तज्ञ सारिका जाधव, आदर्श समाजसेविका नलीनी सोमवंशी, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सोहळ्याचे संयोजन गुणीजन गौरव पुरस्कार मानकरी महामंचाने केले होते.
प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, संस्था पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयचे प्राचार्य समीर तारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!