*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गनिर्मित रंगांची रंगपंचमी उत्साहात साजरी *

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गनिर्मित रंगांची रंगपंचमी उत्साहात साजरी *

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गनिर्मित रंगांची रंगपंचमी उत्साहात साजरी *

*कणकवली : प्रतिनिधि*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या पर्यावरण सेवा योजना विभाग व राष्ट्रीय हरितसेना विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने निसर्गातील विविध घटकांचा वापर करून निसर्ग निर्मित रंग तयार केले या रंगांचे प्रात्यक्षिक पर्यावरण सेवा विभागाचे प्रमुख श्री प्रसाद राणे सरांनी विद्यार्थ्यांना कृतिसह करून दाखविले त्या संदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यान दिले भारतीय संस्कृतीत सणांचे पारंपरिक महत्व याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली आधुनिक काळात रासायनिक रंगांचा शरिराला घातक परिणाम कसा होतो या विषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून आपल्या दररोजच्या जीवनात बीट ‘हळद , पालक भाजी , झेंडूची फुले यांच्या पासून रंग कसे तयार करावेत यांची कृती प्रात्यक्षिकासह करून दाखविली प्रशालेतील विद्यार्थ्यांचे गट तयार करून निसर्गातील घटकांपासून रंग तयार करून घेतले आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्ग निर्मित रंगाची रंग पंचमी साजरी केली . समाजामध्ये विकृत रंगांची रंगपंचमी केली जाते त्याच्या पासून शरिरावर घातक परिणाम होत असतात या विषयी समाज प्रबोधन केले . आदर्श संस्कृती जोपासची तरच भारतीय सणांची नैतिकता जागृत राहून टिकून राहिल असा संदेश विद्यामंदिरच्या या उपक्रमातून दिला गेला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. श्री पी जे कांबळे सरांनी पर्यावरण सेवा विभाग व राष्ट्रीय हरित सेना विभाग यांचे कौतुक करून निसर्ग निर्मित रंग पंचमी विषयी मार्गदर्शन केले प्रशालेचे पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी भारतीय सणांचे आरोग्य विषयक महत्व विषद करून निसर्ग निर्मित रंगपंचमीला शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी सौ शिरसाट मॅडम श्री शेळके जेजे सर व सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला . या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!