*कोंकण एक्सप्रेस*
*मुक्तांगणचा स्नेहमेळावा ३१ रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
बालशिक्षणाचा अभिनव प्रकल्प असलेल्या वेंगुर्ला येथील मुक्तांगणचा स्नेहमेळावा सोमवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री परूळेकर दत्तमंदिर, वेंगुर्ला येथे आयोजित केला आहे.
यावेळी ख्यातनाम कला शिक्षक प्रा.सुनिल नांदोस्कर हे उपस्थित राहणार आहेत. मुलांचे शिकणे मुक्तांगणच्या माध्यमातून अधिक आनंददायी आणि कसदार होण्यासाठी ‘शिक्षण मुलांचे-सहभाग पालकांचा‘ या उपक्रमांतर्गत ‘फलकलेखन प्रकल्प‘ प्रदर्शन व बालगीतांवर आधारीत बालक-पालकांच्या नृत्यनाटिकांचे सादरीकरण या स्नेहमेळाव्यात होणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर तसेच मुक्तांगण परिवारातर्फे केले आहे.