*कोंकण एक्सप्रेस*
*भव्य स्वागत यात्रेने वेंगुर्ल्यात नविन वर्षाचे स्वागत*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
हिदू नववषाचे स्वागत करण्यासाठी वेंगुर्ला शहरात रविवारी सायंकाळी ढोल-ताशे, सनईच्या मधुर वाद्यात काढण्यात आलेली स्वागतयात्रा बहुसंख्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शवित यशस्वी केली. तर पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम नृत्य लक्षवेधी ठरले.
दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानी मंडळींनी याहीवर्षी मराठी नविन वर्षाच्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. स्वागतयात्रेच्या प्रारंभी नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगराई नष्ट होवोत यासाठी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. त्यानंतर तुतारी वाजवून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे आल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
या स्वागतयात्रेत पौराणिक आणि काल्पनिक वेशभूषा केलेली लहान मुले, रविद्र पणशीकर यांनी केलेली शंख फुखणा-या कृष्णाची वेशभूषा, चांदेकर महाराज यांचा वारकरी परिवार, महिला लेझिम पथक वेंगुर्ला ग्रुप, म्हाडा कॉलनी येथील महिलांचे झांज पथक, दाभोली इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी यांच्यासह पारंपारिक वेशातील स्त्री पुरूष सहभागी झाले होते. रामेश्वर मंदिरात मठ येथील बचत गटातील महिलांचा नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.