*कोंकण एक्सप्रेस*
*दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत यात्रेने वैभववाडीत नविन वर्षाचे स्वागत*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने हिदू नववषाचे स्वागत करण्यासाठी वैभववाडी शहरात रविवारी सायंकाळी ढोल-ताशे गजरात काढण्यात आलेली स्वागतयेला बहुसंख्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शवित यशस्वी केली. तर पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम नृत्य लक्षवेधी ठरले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडी च्या वतीने मराठी नविन वर्षाच्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. स्वागतयात्रेचा सुरुवात दत्त मंदिर ते संभाजी चौक परत संभाजी चौक ते दत्त मंदिरापर्यंत स्वागत यात्रा काढण्यात आली
या स्वागतयात्रेत वेशभूषा, वारकरी दिंडी मुलांचे लेझिम पथक ढोल पथक व बैलगाडी मुळे स्वागत यात्रेला शोभा आली होती. स्वागत यात्रेत महिला पुरुष व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.