*कोंकण एक्सप्रेस*
*मराठा महासंघ दोडामार्ग ची ३१ मार्चला बैठक…*
*दोडामार्ग/शुभम गवस*
अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्गची बैठक सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी हॉल दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली असून मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा महासंघ दोडामार्ग तालुका अध्यक्ष उदय पास्ते यांनी आवाहन केले आहे.
सदर बैठकीत दोडामार्ग बांधवांसाठी विविध योजना, शासकीय लाभ तथा आगामी मराठा बांधवांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तरी तमाम मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दोडामार्ग तालुका अध्यक्ष उदय पास्ते यांनी केले आहे.