*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी नं. १ शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत गौरवशाली यश*
*शिरगाव : संतोष साळसकर*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत आयोजित डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी नं.१ च्या विद्यार्थ्यांनी गौरवशाली यश संपादन केले आहे. या परीक्षेस या प्रशाळेतून आठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यामध्ये इयत्ता चौथीतील ईश्वरी गांवकर हिने १७८ गुणांसह साळशी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला, तर आराध्य तेली याने १५८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांना केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, पदवीधर शिक्षक संतोष मराठे व ज्ञानोबा हाके, तसेच वर्गशिक्षक प्रकाश झाडे व उपशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या प्रयत्नातून व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने हे यश शक्य झाले.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, शिक्षकवृंद, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश केवळ शाळेपुरते मर्यादित नसून, संपूर्ण गावाच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे. हे यश संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे
.
