*आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते सन्मान*

*आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते सन्मान*

*कोंकण एक्सप्रेस*

*चिंदर ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात सलग चौथ्या वर्षी अव्वल..!*

*आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते सन्मान*

*मालवण | संतोष साळसकर*

मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक दिगंबर महादेव जाधव यांनी सन २०२४ – २०२५ या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये ४६५३ एवढ्या मनुष्यदिनाची निर्मिती करुन उल्लेखनीय कामगिरी करत मालवण तालुक्यात सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला बालकल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोळंब येथे आयोजित महिला मेळाव्यात आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिगंबर जाधव यांचा चिंदर ग्रामपंचायत अधीकारी मंगेश साळसकर यांच्या समवेत गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती अधीक्षक भीमसेन पळसंबकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर धनगे, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, उमेद अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळी, उमेद प्रभाग समन्वयक प्रिया धरणे, विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, विस्तार पी. डी. जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!