*कोंकण एक्सप्रेस*
*चराठा ग्रा.प.सदस्या गौरी गावडेंसह राष्ट्रवादी (श.प.) गटातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत*
*जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
चराठा ग्रामपंचायतीच्या सदस्या गौरी सागर गावडे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत आपले स्वागत असून तुम्हाला निश्चितच योग्य सन्मान दिला जाईल, असे आश्वासन यावेळी संजू परब यांनी दिले.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, चराठा सरपंच सौ. प्रचिती कुबल, विभाग प्रमुख राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
यावेळी गौरी गावडे यांच्यासह स्वरांजली पावसकर, नतालिन डीसोजा, लावदिन डिसोजा, स्वाती चिंदरकर, संचिता गावडे, अमिता गावडे, शीतल म्हसकर, फातिमा डिसोजा, संदीप बांदेकर, अनंत गावडे, महेश नाईक, ग्रासीन डिसोजा, संजना वाडेकर, अनुजा कानसे, पंढरीनाथ कदम, तारीका गावडे, अथर्व दळवी, भूमिका दळवी, चेतन चिंदरकर, कुणाल गावडे, आकाश गावडे, समीर चितारी, यासिन मुलानी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संजू परब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडी मतदार संघातील उबाठासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. लवकरच महाविकास आघाडीतील अजूनही काही मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी संजू परब यांनी दिली.