*कोंकण एक्सप्रेस*
*आ.दीपकभाई केसरकर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती *
*पाडव्यापासून जबाबदारी सांभाळणार*
*सावंतवाडी : प्रतिनिधि*
शिवसेनेचे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर यांची शिवसेना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आ. केसरकर यांनी शिवसेना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी ‘यशस्वीपणे सांभाळली होती. आपण गुढीपाडव्यापासून या
पदाची पुन्हा जबाबदारी सांभाळणार असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतर नाट्यानंतर श्री. केसरकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून पक्षाची अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली होती.

