*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड हायस्कूलमध्ये भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूल मध्ये शाळेतील भूगोल विषय समितीमार्फत विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची रुची वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भूगोल विषयाचे सामान्य ज्ञान अद्यावत ठेवण्याच्या उदात हेतूने दरवर्षी भूगोल विषयाची ऑनलाईन प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते.
यावर्षी देखील इयत्ता सहावी ते नववी या इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये प्रत्येक इयत्तेमधून प्रथम तीन क्रमांक काढून विजेत्यांना प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगोल विषय समितीमधील भूगोल विषय शिक्षक प्रवीण खडपकर, अजित सुरंगले, ज्ञानेश्वर कुंभरे, सौ पूजा गोसावी, अरविंद धुर्वे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी या स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक करून या भूगोल विषयाच्या उपक्रमाबद्दल भूगोल विषय समितीचे देखील कौतुक केले.