*फोंडाघाट येथे नववर्ष जल्लोषासाठी ‘गुढीपाडवा महोत्सव’चे आयोजन*

*फोंडाघाट येथे नववर्ष जल्लोषासाठी ‘गुढीपाडवा महोत्सव’चे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट येथे नववर्ष जल्लोषासाठी ‘गुढीपाडवा महोत्सव’चे आयोजन*

*फोंडाघाट – गणेश ईस्वलकर*

येथील *संस्कृती कलामंच फोंडाघाट* यांच्या वतीने *नववर्ष जल्लोष* आणि *गुढीपाडवा महोत्सवाचे* भव्य आयोजन करण्यात आले आहे. *३० मार्च २०२५* रोजी होणाऱ्या या उत्सवात पारंपरिक ढोलताशा, वासुदेव, शिवकालीन मर्दानी खेळ, तसेच लोकनाट्य आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

गुढीपाडवा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे *‘रंग भारती’* या लोकप्रिय ग्रुपकडून सादर होणारा लोककला आणि मनोरंजनाचा कार्यक्रम. यात *गणेश वंदना, जोगवा, कोळी नृत्य, गोंधळ* आणि विविध पारंपरिक लोकनृत्यांचा समावेश असेल.

यासोबतच संस्कृती कलामंच आयोजित *‘नृत्य अभिनिवेश’* या विशेष नृत्यप्रदर्शनातून कलाकार विविध लोककलेचे सादरीकरण करणार आहेत. या सोहळ्यात स्थानिक ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*कार्यक्रमस्थळ:* मारुती मंदिर ते बस स्टँड, फोंडाघाट
*वेळ:* सकाळी ५:३० वा.

ग्रामस्थ आणि कलाप्रेमींनी या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन *संस्कृती कलामंच फोंडाघाट व ग्रामस्थांकडून* करण्यात आलेआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!