*शाळा कणकवली क्रमांक ३ चे एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञा परीक्षेतील सुयश*

*शाळा कणकवली क्रमांक ३ चे एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञा परीक्षेतील सुयश*

*कोंकण एक्सप्रेस*

*शाळा कणकवली क्रमांक ३ चे एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञा परीक्षेतील सुयश*

*शिरगांव | संतोष साळसकर*

कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली क्रमांक तीन या शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे या शाळेतील इयत्ता सातवीच्या विराज संतोष कुमार कल्याणकर याने ३०० पैकी २५८ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे तर इयत्ता सातवीच्या अन्वयअच्युत देसाई याने तीनशे पैकी २२० गुण मिळवून कणकवली तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर इयत्ता सातवीतील गाथा अमोल कांबळे हिने ३०० पैकी २१८ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ अक्षया राणे यांनी मराठी विषयाचे, पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांनी गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे तर सौ विश्वंभरी कल्याणकर यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले आहे या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे तसेच सर्व सहकारी शिक्षक शाळा कणकवली क्रमांक तीन यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे त्याचबरोबर शाळेने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश चव्हाण उपाध्यक्ष सौ सायली राणे तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पालक वर्गातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!