*कोंकण एक्सप्रेस*
*नवाबाग येथे रविवारी वार्षिक उत्सव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
नवाबाग येथील बायुला घुमटेश्वर मंदिरात रविवार दि. ३० मार्च या गुढीपाडव्या दिवशी वार्षिक उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ब्राह्मण देवस्थान येथे धार्मिक विधी, सायं. श्रीसत्यनारायण महापूजा, आरती, भजने, रात्रौ ९.३० वा.तेंडोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.