*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ल्यात रविवारी भव्य स्वागतयात्रा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
हिदू नववर्षाच्या स्वागतासाठी हिदूधर्माभिमानी वेंगुर्लातर्फे रविवार दि.३० मार्च रोजी भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्वागतयात्रा सायं. ५ वा. रामेश्वर मंदिर येथून सुरू होऊन शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, गाडीअड्डा, मारुती मंदिरमार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे त्याची सांगता होणार आहे. तरी या स्वागतयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.