*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच महेश राणे यांच्यासह राणेवाडी – मोंडकरवाडीतील सुमारे ५० ग्रामस्थांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित केला भाजप मध्ये जाहीर प्रवेश*
*उबाठा सेनेला मोठा धक्का*
*चाफेड गावाची संपूर्ण ग्रामपंचायत भाजपमय*
*चाफेड गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ; ना. मंत्री नितेश राणे*
*शिरगांव | संतोष साळसकर*
स्थानिक आमदार आणि पालकमंत्री म्हणून या चाफेड गावच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढा विकास निधी देता येईल तेव्हडा मी देणार. गावच्या शेवटच्या नागरिकापर्यंत आपल्याला विकास पोहोचवायचा आहे. विकास साधताना संवाद आणि चर्चा या माध्यमातून तुम्ही मला कधीही भेटू शकता. हिंदुत्वाची बाजू आम्ही लावून धरतोय. येत्या एप्रिल महिन्यात जिल्हा नियोजनाची बैठक लावणार. हा प्रवेश झाल्यानंतर विकासाची प्रक्रिया कशी सुरू झाली याचा अनुभव एप्रिल पासून तुम्ही घ्याल. यापुढे तुम्हाला भाजप पक्षात योग्य स्थान, सन्मान आणि पदे मिळतील असे सांगत सर्वांचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भाजपची शाल घालून सर्वांचे स्वागत केले.
हा जाहीर सत्कार सोहळा चाफेड गावठण येथील आई कुलस्वामिनी मंदिराच्या समोरील पटांगणात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. मंत्री नितेश राणे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी चाफेड गावचे उबाठा सेनेचे प्रभारी सरपंच महेश राणे , शाखाप्रमुख उदय राणे, उपशाखाप्रमुख उमेश राणे, नवनीत राणे, सल्लागार वामन राणे, युवा सेना पदाधिकारी मंजिरी राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर यांच्यासह लवू राणे, नामदेव मोंडकर, प्रकाश मोंडकर, मंगेश राणे, महेंद्र राणे, आनंद मोंडकर, रमाकांत राणे, शशिकांत राणे, परशुराम मोंडकर, हर्षद राणे, रामकृष्ण मोंडकर, रमेश राणे, दीपक राणे, भास्कर राणे, मनोहर राणे, हेमांगी राणे, सानवी मोंडकर, ज्योती राणे, अस्मिता मोंडकर, ज्योती मोंडकर, वैजयंती मोंडकर, नीता मोंडकर, रत्नमाला मोंडकर, मानवी राणे, मयुरी राणे, सुचिता राणे, भारती राणे, सुरेखा राणे, सुनीता मोंडकर, रेश्मा राणे, शीतल राणे, किर्ती राणे, निशा राणे, मंदाकिनी राणे, नीता राणे, गौरी राणे, सुनंदा राणे, तानाजी राणे, सुलोचना राणे, रमेश मोंडकर, वैशाली राणे, वंदना राणे, शालिनी राणे, माजी पोलिस पाटील आबा राणे, नीलिमा राणे, प्रसाद मोंडकर, दीपक मोंडकर, चंद्रकांत मोंडकर, प्रदीप मोंडकर, रविकांत मोंडकर, साधना राणे, वासंती राणे, बाळकृष्ण राणे, भाऊ राणे, सायली मोंडकर आदींनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
या सत्कार सोहळ्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, ज्येष्ठ नेते मिलिंद साटम, चाफेडचे माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान भोगले, माजी सरपंच आकाश राणे, चाफेड बूथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, माजी सरपंच संतोष साळसकर, शिरगावचे माजी सरपंच महेश मेस्त्री, पांडू घाडी, चाफेडच्या माजी सरपंच दिपाली घाडी, चाफेडचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण राणे, विजय परब शैलेंद्र जाधव, सिद्धेश भोगले, सत्यवान कांडर, कौस्तुभ घाडी आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भजनी बुवा विशाल राणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेश राणे यांनी ना. नितेश राणे यांना लेखी निवेदने दिली. यात चाफेड गावठण नळपाणी योजना पाईप लाईन दुरुस्ती करणे, गावठण येथे जिओ किंवा बीएसएनएल टॉवर, गांगेश्वर मंदिर पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे असे लेखी निवेदने दिली