*कोंकण एक्सप्रेस*
*सातेरी वाचनालयातर्फे रविवारी पुरस्कारांचे वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना जीवनगौरव व कर्तृत्ववान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण ३० मार्च रोजी दुपारी ३ वा.साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जाहीर झालेल्या जीवनगौरव पुरस्कारांमध्ये शेतकरी विजय नाईक, माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक तसेच साहित्यिक अजित राऊळ यांचा तर कर्तृत्वान पुरस्कारांमध्ये सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, उद्योजिका आरती शेणई, दै.सकाळचे म्हापण प्रतिनिधी संदिप चव्हाण, कृषी संगम सखीच्या विलासिनी नाईक यांचा समावेश आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.