*कोंकण एक्सप्रेस*
*कॅम्प – भटवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला शहरातील कॅम्प-भटवाडी परिसरात रात्रौच्यावेळी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलामध्ये वास्तव्य करणारे प्राणी आता थेट वस्तीमध्ये घुसू लागले आहे. शहरातील कॅम्प-भटवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी रात्रौ ९.३० च्या सुमारास वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन झाले. अचानक घडलेल्या या प्रकाराने वाहनधारकांची तारांबळ उडाली. तर या प्रसंगाने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथील काही नागरिकांकडे गाईगुरे असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.