तीर्लोट मोहूळगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तीर्लोट मोहूळगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*तीर्लोट मोहूळगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश*

*मंत्री नितेश राणे यांनी घेतला संपूर्ण उबाठा बूथचाच प्रवेश*

*भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश*

*देवगड ः प्रतिनिधी*

तीर्लोट मोहूळगाव, ता. देवगड, बूथ क्रमांक २६८/८ येथील उबाठा पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी अविनाश अनभवणे, सुनील अनभवणे, धनंजय भिकाजी अनभवणे, यश सुनील अनभवणे, श्रीकांत सिताराम अनभवणे, आदित्य सिताराम अनभवणे, अशोक अनंत वाडेकर, विलास अनंत वाडेकर, सुरेंद्र नामदेव वाडेकर, संतोष मधुकर वाडेकर, संदीप वाडेकर, रमेश तीर्लोटकर, अंकुश आप्पा बाईत, विश्वनाथ गंगाराम बाईत, आकाश अंकुश बाईत, प्रभाकर अनंत बाईत, अजित प्रभाकर बाईत, संदेश रमेश बाईत, संजय लक्ष्मण मांडवकर, विश्वनाथ अनभवणे आणि सुभाष तिर्लोटकर, मंगेश मांडवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याला पक्षातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपा नेते बाळ खडपे , संजय बोंबडी, आरीफ बगदादी, रतनशेठ दळवी, मंगेश मांडवकर रमाकांत घाडी, रामचंद्र सारंग, सतीश बाईत आणि प्रवीण अनभवणे यांचा समावेश होता.

भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी
या प्रवेशामुळे भाजपला तिर्लोट मोहूळगाव व परिसरात अधिक बळ मिळाले आहे. स्थानिक राजकारणात याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!