*कोंकण एक्सप्रेस*
*ब्रेनडेव्हलपमेंट परीक्षेत तनिषा सातार्डेकरने पटकाविले सुर्वणपदक*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी कु. तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४-२५ या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे.
कु.तनीषा हिचा ऑल इंडियामधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे. तिला स्कूलमधील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तनीषा हिने सुवर्ण पदकाची कमाई केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असून या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

