तिलारी घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र येत्या आठ दिवसात आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात यावे : प्रवीण गवस

तिलारी घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र येत्या आठ दिवसात आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात यावे : प्रवीण गवस

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र येत्या आठ दिवसात आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात यावे : प्रवीण गवस*

*…. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

कर्नाटकात तसेच कोल्हापुरात जाण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातून सगळ्यात लगतचा मार्ग असलेला तिलारी घाट गेले कित्येक महिने एसटी वाहतूकी साठी व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता,आता तिलारी घाट सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र परिवहन महामंडळाच्या सर्वे नुसार अनेक ठिकाणी ब्लाईड स्पॉट आहेत. त्या ब्लाईड स्पॉट वर आरसे बसवण्या संदर्भात परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. तरी सदर ठिकाणी तात्काळ आरसे बसवून सदरची तिलारी घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र येत्या आठ दिवसात आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात यावे असे लेखी पत्र स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगड यांना दिले आहे.
पुढे ते पत्रात म्हणाले की,तिलारी घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र येत्या आठ दिवसात आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात यावे अन्यथा आपल्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व उद्भवणाऱ्या परिस्थितीत संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!