*स्व. दिपक गुरव यांचा चतुर्थ स्मृतिदिन केंद्रशाळा साळिस्ते नं. १ येथे संपन्न* 

*स्व. दिपक गुरव यांचा चतुर्थ स्मृतिदिन केंद्रशाळा साळिस्ते नं. १ येथे संपन्न* 

*कोंकण एक्सप्रेस*

*स्व. दिपक गुरव यांचा चतुर्थ स्मृतिदिन केंद्रशाळा साळिस्ते नं. १ येथे संपन्न* 

स्व. दिपक यांच्या चतुर्थ स्मृतिदिन स्व. दिपक गुरव मित्रमंडळ साळिस्ते व भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. या दरम्यान प्रतिवर्षाप्रणाने याहीवर्षी सामाजिक, शासकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा दीपगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये आदर्श केंद्र प्रमुख गोपाळ चव्हाण, आदर्श मुख्याध्यापक सत्यवान घाडीगांवकर, आदर्श शिक्षक सिताराम पारधिये, संजना ठाकूर, संगीता वळवी, माधवी बुचडे, मृणाली पिसे, दिपाली कुंभार, आदर्श ग्रामसेवक विशाल वरवडेकर, आदर्श प्राध्यापक नरेश शेट्ये या सर्व आदरणीय व्यक्तींना दीपगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साळिस्ते गावचे प्रथम नागरिक प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, उपाध्यक्ष गजानन रांबाडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल ताम्हणकर, मयुरी मेस्त्री, साक्षी कांजीर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. तद्नंतर केंद्र शाळा साळिस्ते नं. १ व शाळा साळिस्ते कांजीर वाडी, अंगणवाडी साळिस्ते नं. १ अंगणवाडी साळिस्ते कांजीरवाडी, अंगणवाडी साळिस्ते रांबाडेवादी या सर्व शाळांमधील मुलांना पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित साळिस्ते गावचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रा. प. सदस्य प्रेमलता गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, उपाध्यक्ष गजानन रांबाडे, मुख्याध्यापक घाडीगांवकर सर, माजी सरपंच चंद्रकांत हरयान, माजी उपसरपंच उदय बारस्कर, शिक्षण प्रेमी संतोष पाष्टे, बिडवाडी गाव प्रतिनिधी संतोष लाड, नागेश लाड, बुरंबावडे गाव प्रतिनिधी दुधवडकर, अनिल ताम्हणकर, प्रशांती गुरव, प्राध्यापक नरेश शेट्ये, आदी शिक्षक वृंद, विध्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे कणकवली उपविभागाचे कोषाध्यक्ष संतोष पाष्टे, जिल्हा कोशाध्यक्ष, ओमकार गुरव, अध्यक्ष अशोक जगताप, दिपाली गुरव यांनी केलेले होते. यावेळी ओमकार गुरव यांनी प्रतिवर्षी एका मुलाला दत्तक योजने मार्फत दत्तक घेणार असल्याचे जाहीर केलं. शेवटी सर्वच प्रतिष्ठित व्यक्तीच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!