*कोंकण एक्सप्रेस*
*श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला ६० पेक्षा अधिक रुग्णाने घेतला लाभ*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
वैभववाडी तालुक्यातील कुभवठे ग्रामपंचायत येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीर ६० पेक्षा अधिक रुग्णाने शिबिराचा लाभ घेतला
वैभववाडीतालुक्यात श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने कुभवडे गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात 60 पेक्षा अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून या शिबिरामध्ये शुगर बीपी सांधेदुखी त्वचारोग आधी आजारी रुग्णांवर उपचार करण्यात आले व या रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली या शिबिराचे उद्घाटन कुंभवडे गावच्या सरपंच शिल्पा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक संदीप पाटील संस्थेचे सचिव सुधाकर येवले उपसरपंच विनोद कदम सी एच ओ शुभम राठोड आरोग्य सेविका सुप्रिया तांबे आशा सेविका संजना कोंडविलकर डॉ अनिरुद्ध मुद्राळे डॉ प्राची जाधव डॉ पूनम मर्गज कैलास पवार आधी कर्मचारी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.