*रंगोत्सव सेलीब्रेशनच्या इंटरनैशनल स्पर्धेत हडपीड खालचीवाडी शाळेचे घवघवीत यश*

*रंगोत्सव सेलीब्रेशनच्या इंटरनैशनल स्पर्धेत हडपीड खालचीवाडी शाळेचे घवघवीत यश*

*कोंकण एक्सप्रेस*

*रंगोत्सव सेलीब्रेशनच्या इंटरनैशनल स्पर्धेत हडपीड खालचीवाडी शाळेचे घवघवीत यश*

*शिरगाव : संतोष साळसकर*

रंगोत्सव सेलिब्रेशन जैन औरगनायझेशन फॉर इंटरनेशनल लेवल आर्ट कॉम्पीटीशन मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडपीड खालचीवाडी शाळेने उत्तुंग यश संपादन केले आहे.
कु. अन्वी जयेंद्र चव्हाण हिने कार्टून मेकींग स्पर्धेत ऐ प्लस ग्रेड मिळवत इंटरनैशनल सेकेंड रैंक प्राप्त केली असून तिला ‘द एम.एफ. हुसेन जैवौर्डने सन्मानित केले जाणार आहे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व मल्टीकलर एलसीडी रायटींग पैड असे पुरस्काराचे खरूप आहे.
तसेच कुमार हर्ष प्रकाश चव्हाण(रंगभरण)व कु. सई संजय राणे (हस्ताक्षर)वि‌द्यार्थ्यांना इंटरनेशनल मेडल प्राप्त झाले आहे. तर देवेंद्र अरविंद राणे (रंगभरण) व सृष्टी सुधिर राणे ( कोलाज मेकींग) यांना स्पेक्टॅक्युलर परफॉरमन्स अवार्ड प्राप्त झाला आहे. तर अनन्या राजाराम कडू (हस्ताक्षर) व मानसी सत्यविजय कर्ल (रंगभरण) यांना कन्सोलेशन प्राइज म्हणून विशेष भेटवस्तू देवून गौरविले जाणार आहे.
या सर्व यशस्वी वि‌द्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री जयेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ रचना राजाराम कडू व शाळा व्यस्थापन समितीचे सर्व सदस्य, सहशिक्षिका हेमलता जाधव, पालक, माजी विद‌यार्थी, ग्रामस्थ सरपंच सौ. संध्या राणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!