प्रधानमंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचं नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

प्रधानमंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचं नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

*कोकण Express*

*प्रधानमंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचं नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन..!*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

प्रधानमंत्री आवास योजनेचे डेमो हाऊसचे भूमिपूजन आ.नितेश राणे यांच्या हस्ते झाले. पंचायत समिती परिसरात हा भूमिपूजन सोहळा पार पडला.

प्रधानमंत्री आवास योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुला संदर्भातील माहिती अधिक सुलभ व्हावी. यासाठी वैभववाडी पंचायत समिती कार्यालयासमोर घरकुलाची उत्तम नमुना प्रतिकृती (डेमो हाऊस) उभारण्यात येत आहे. या डेमो हाऊसचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज झाले. घरकुल योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सदर घरकुलात कोणकोणत्या सोयी असाव्यात, ते घरकुल कसे असावे, याबाबत माहिती या डेमो हाऊस मधून दिली जाणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष नासीर काझी, माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पं. स. उपसभापती अरविंद रावराणे, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, भारती रावराणे, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार, बंड्या मांजरेकर, राजेंद्र राणे, राजू पवार, संजय सावंत,बाळा हरयाण, किशोर दळवी, विश्राम राणे, उदय पांचाळ, प्रदीप नारकर, गजानन पाटील, स्वप्निल खानविलकर, संताजी रावराणे, रत्नाकर कदम, सुनील भोगले, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!