*कोंकण एक्सप्रेस*
*ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सावंतवाडीच्या विराज सावंत याचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
मूळचा सावंतवाडी येथील सध्या मुंबईस्थित असलेल्या कु.विराज सूरज सावंत याने राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत बाजी मारली आहे. १०० पैकी ९४ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त करत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत त्याने ६७ वे स्थान मिळविले.
कु. विराज हा पराग विद्यालय व सायन्स अॅण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, भांडुपचा तो पहिलीचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षक वृंद, परिवार, आप्तेष्ट व मित्रपरिवार अशा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.