*एडगांव येथे भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक*

*एडगांव येथे भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक*

*कोंकण एक्सप्रेस*

*एडगांव येथे भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे वय ५८ रा. करूळ भोयडेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष रामकृष्ण माळकर वय ४८ रा. करूळ हे तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगांव घाडीवाडी नजीक घडली. जखमींना ओरस येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल होत अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.
वैभववाडीहून करूळकडे रिक्षा घेऊन चालक गणपत धावडे जात होते. कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धावडे व रिक्षात बसलेले माळकर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही तात्काळ ओरसकडे हलविण्यात आले आहे. तरेळे-गगनबावडा या मार्गाचे सद्यस्थितीत रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ता काम पूर्ण झाले आहे. काँक्रिटच्या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने चालवली जात आहेत. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!