*शिरोडा येथे ३१ मार्च रोजी ‘‘मालवणी साहित्य संमेलन‘*

*शिरोडा येथे ३१ मार्च रोजी ‘‘मालवणी साहित्य संमेलन‘*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरोडा येथे ३१ मार्च रोजी ‘‘मालवणी साहित्य संमेलन‘*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने सोमवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी ३.३० ते रात्री ८ या कालावधीत ‘‘मालवणी साहित्य संमेलना‘‘चे आयोजन केले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक सतीश लळीत हे असतील. या संमेलनामध्ये दुपारी ३.३० ते ४ नोंदणी व चहापान, दुपारी ४ ते ५ संमेलनाचे उद्घाटन, संध्या. ५ ते ६ ‘मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे?‘ यावर परिसंवाद असणार असून यामध्ये भाऊसाहेब गोसावी (अध्यक्ष), कल्पना मळये, तनुजा तांबे आदी सहभागी होणार आहेत. यानंतर अल्पोपाहार. संध्या. ६.१५ ते ६.३० कै. जयवंत दळवी यांचा ‘मालवणीनामा‘ कार्यक्रम, संध्या. ६.३० ते ७.३० वा. कविसंमेलन यामध्ये अध्यक्षा डॉ. सई लळीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर संमेलनाचा समारोप असणार आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी ९४०३०८८८०२ यावर संफ साधावा असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्टाचे समन्वयक विनय सौदागर आणि र.ग. खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!