*कोंकण एक्सप्रेस*
*संदेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ३ एप्रिल ला होणाऱ्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी कनेडी येथील वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमाबरोबरच एसटीएस परीक्षेच्या ऑनलाइन निकालही जाहीर करण्यात येणार आहे.
उद्या पासून २७ व २८ मार्च या कालावधीत १५१ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरपूरवारी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नरसोबाचीवाडी, तुळजापूर, पंढरपूर यात्रा घडविण्यात येणार आहे. शनिवार, २९ मार्च रोजी सकाळी ९ वा. कनेडी बाजारपेठ येथे भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. सोमवार, ३१ मार्च रोजी सायं. ७ वा. सांगवे-कनेडी माददे ‘छावा’ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. मंगळवार१ एप्रिल रोजी मुलगे व मुलींसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तू देण्यात येणार आहेत. याशिवाय ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
बुधवार, २ एप्रिल रोजी दुपारी २ वा. कनेडी बाजारपेठ येथे पाककला स्पर्धा होणार आहे. यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे मिक्सर, प्रेशर कुकर व सिलिंग फॅन तर ४ ते १० क्रमांकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. याच आकर्षक दिवशी सायं. ६ वा. ‘होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा स्पर्धा होणार आहे. विजेत्या महिलेला वॉशिंग मशिन व पैठणी देण्यात येणार आहे. तर उपविजेतीला एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाला मिक्सर देण्यात येणार आहे. याशिवाय ४ ते १० क्रमांकांना आकर्षक भेटवस्तू व उपस्थित आहे. महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे यामधील विजेत्या प्रेक्षकाला एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. तर २ ते दहा क्रमांकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. गुरुवार, ३ एप्रिल रोजी सकाळी १० वा वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे होणार आहे. ११ वा. भिरवंडे येथील ‘मातोश्री वृद्धाश्रम येथे फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे दु. १२ वा करंजे येथील दिव्यांग शाळेत पोषण आहार साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ३ वा ‘सिंयुरत्न टॅलेंट सर्च या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (www.yuvasandeshsts2025.co) या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वा. कनेडी येथील समाधी पुरुष हॉलमध्ये वारकरी भजन सपर्या होणार आहे, पानी पर्यांना आकर्षक बक्षिसे सन्मानचिन्ह तसेच प्रवासखर्चही देण्यात येणार आहे सर्वांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संदेश सावंत मित्रमंडळ व युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.