*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी-झरेबांबर हि बस पुन्हा सुरू करावी*
*या संदर्भात लेखी निवेदन जेनिफर मार्शल लोबो मा. ग्रा पं. सदस्य साटेली भेडशी यांनी सावंतवाडी बस स्थानक कार्यालय येथे दिले*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
सावंतवाडी येथून निघणारी सावंतवाडी-झरेबांबर हि बस रात्री उशिरा म्हणजे पावणे आठ च्या दरम्यान झरेबांबर ला येते व तिथेच वस्तीला थांबते. तसेच बस मधील प्रवासी हे साटेली भेडशी, घोटगे, परमे, मोर्ले शिरंगे खानयाळे. बोडदे या परिसरातील असतात. झरेबांबर वरून रात्री उशिरा त्यांच्या गावी जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. तसेच सकाळी हीच बस पावणे सहा ला सुटते त्यामुळे पहाटे कॉलेज तसेच शाळेला जाणारी मुले याच गावातील असलेने त्यांना झरेबांबरला यावे लागते त्यांना येण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कसेबसे यावे लागते. काही मुलांना हि बस चुकली तर शाळेचे नुकसान होते. तर कामावरील लोकांचे पण मोठ्याप्रमाणात नुकसान होते.
झरेबांबर वरून पुढे साटेली भेडशी येथे सोडावी व पुन्हा वस्तीला झरेबांबर येथे घ्यावी तसेच सकाळी ती बस पुन्हा साटेली भेडशी येथून सोडावी जेणेकरून प्रवाशी व विद्यार्थ्यांची सोय होईल.
या संदर्भात लेखी निवेदन जेनिफर मार्शल लोबो मा. ग्रा पं. सदस्य साटेली भेडशी यांनी सावंतवाडी बस स्थानक कार्यालय येथे दिलेले आहे.
तसेच आपल्या पत्रात त्यांनी तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलेला आहे.