*धाराशिव पणजी एस. टी. बस रस्त्याकडेला असलेल्या दगडावर आदळून अपघात*

*धाराशिव पणजी एस. टी. बस रस्त्याकडेला असलेल्या दगडावर आदळून अपघात*

*कोंकण एक्सप्रेस*

*धाराशिव पणजी एस. टी. बस रस्त्याकडेला असलेल्या दगडावर आदळून अपघात*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी ते सोनाळी दरम्यान काढलेल्या पर्यायी मार्गावर गणपती साणा येथे पडलेल्या खड्ड्यामुळे धाराशिव पणजी एस. टी. बस रस्त्याकडेला असलेल्या दगडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र एस. टी. बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडला. त्यामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती.
तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर शुकनदी पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे वैभववाडी तहसीलदार कार्यालय ते सोनाळी असा पर्यायी कच्चा रस्ता तयार कारण्यात आला आहे. शुकनदी जवळ गणपती साणा येथे रस्ता अरुंद असून त्या ठिकाणी एकरी वाहतूक सुरु असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. बुधवारी पहाटे धाराशिव पणजी बस हे खड्डे चुकवत असताना रस्त्याकडेला असलेल्या दगडावर जाऊन आदळली. यात एस. टी च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे एस टी बस मधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
गेले दोन महिने या पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरु असून फोंडा घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे सर्व वाहतूक या मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावर वाहनाची वर्दळ मोठया प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर या पर्यायी मार्गांवर गणपती साणा येथे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी अपघात घडत आहेत.

याच पर्यायी मार्गावर सोनाळी येथे गगनबावडा घाटाकडे जाण्यासाठी यु आकाराचे वळण आहे. मात्र हे वळण अरुंद असल्यामुळे मोठे ट्रक, एस टी बस, खाजगी आराम बस यांना वळण घेताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी बऱ्याचवेळा वाहतूक कोंडी होत आहे. तसेच यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!