*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सन 2024 – 2025*
*सावंतवाडी -प्रतिनिधि*
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) ÷ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सन 2024 – 2025 या वर्षासाठी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केंद्रशाळा आजगांव नं. 1 शाळेचा सावंतवाडी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी सावंतवाडी येथे संपन्न झाला. गटविकास अधिकारी सन्माननीय श्री.वासुदेव नाईक साहेब आणि गटशिक्षणाधिकारी सन्माननीय सौ.कल्पना बोडके मॅडम यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय श्री.बाळकृष्ण हळदणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ.ममता मोहन जाधव मॅडम, उपशिक्षिका सन्माननीय सौ.दीपाली केदार मॅडम, सन्माननीय श्री. दत्तगुरु कांबळी साहेब व शिक्षक वर्ग यांनी हे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते स्विकारले.बक्षिस स्वरुप 1) सन्मान पदक 2) प्रमाणपत्र
3) दोन लाख रुपये मात्र
यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, आजगांव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ, इतर सर्व तसेच प्रशासकीय अधिकारी या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मान्यात आले.