*कोंकण एक्सप्रेस*
*लाडक्या बहिणीना निवडणूकीमध्ये दरमहा २१०० रूपये चे आश्वासनन पाळण्या संदर्भात.*
*दोडामार्ग/ शुभम गवस..*
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन अडीच लाख पेक्षा कमी आहे. अशा महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना सरकारने सुरू केली. विधानसभा निवडणूकीत हे मानधन १५०० रूपयांवरून २१०० रूपये करणार असे आश्वासन दिले गेले त्याचा परिणाम मतदारांवर होऊन सत्ता पण आल, पण प्रत्यक्षात गेले दोन महिने मानधन खात्यात जमा करणे सरकारला शक्य झाले नाही. आता मात्र आश्वासन दिलेले २१०० रूपये सोडा १५०० रूपये पण खात्यात जमा होत नसल्याने महिल्यांची अपेक्षा भग होत आहे. आमची मागणी आहे की, सरकार लवकरात लवकर २१०० रूपये आम्हां महिलाच्या खात्यात जमा करावे.
दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख विनिता विष्णु घाडी, कोनाळ विभाग प्रमुख जेनिफर लोबो , उप तालुकाप्रमुख रेश्मा शेख , शिवसैनिक गणेश धुरी ,करमळकर ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.