*श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त साळशी-नाईकवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम*

*श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त साळशी-नाईकवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त साळशी-नाईकवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी-नाईकवाडी येथील श्री दत्त मंदिरात सोमवार ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सायंकाळी ४ वाजता श्री गणेश पूजनाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ४.३० वाजता श्री स्वामी समर्थ मूर्ती अभिषेक, ५ वाजता मूर्ती स्थापना, ५.३० वाजता महाआरती, ६ वाजता तीर्थप्रसाद व ७ वाजता स्थानिक सुस्वर भजने होणार आहेत.
या भक्तिमय कार्यक्रमांतून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, साळशी-नाईकवाडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!