*कोंकण एक्सप्रेस*
*सघर्षातून गौरवास्पद ज्ञानसाधना – विरेंद्र कामत आडारकर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी : प्रथमेश गुरव*
-‘‘ध्येयाचा वेध घेताना मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी आल्या. संकटे आली. पण मॅडम तुमच्या मनात जिद्द होती. त्यांना कष्टाची, प्रयत्नांची जोड दिलात. तुम्ही प्रामाणिक अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवून ज्ञानसाधना केलात‘‘ असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर यांनी काढले.
उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इंग्रजी विषय शिक्षिका वर्षा वसंत मोहिते या आपल्या ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त १९ मार्च रोजी साई डिलक्स हॉल येथे त्यांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक सावळाराम कांबळी, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, उल्का वाळवेकर, शिक्षणप्रेमी विष्णू मांजरेकर, राधाकृष्ण मांजरेकर, बी.एस.मोहिते, अशोक पोवार, श्रीकृष्ण पेडणेकर, सर्व संस्था कार्यकारिणीचे पदाधिकारी संस्थेचे माजी पदाधिकारी, पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पालक, मोहिते, केसरकर, घोरपडे व पोवार कुटूंबिय, माजी शिक्षक-शिक्षिका, अन्य शाळातील शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
विरेंद्र कामत आडारकर यांनी वर्षा मोहिते यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार तर संस्था कार्यकारिणी सदस्य, आजी-माजी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक व विद्यार्थी यांच्या मार्फत सोन्याची अंगठी तसेच सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अजित केरकर, सुजित चमणकर व निलेश मांजरेकर यांनी माजी विद्यार्थी संघाच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व चांदीची गणेश मूर्ती देऊन सत्कार केला.
साक्षी तुळसकर, रोशन केळुसकर, ईशा गिरप, अमृता नवार या विद्यार्थ्यांसह राजलक्ष्मी मोहिते, पराग मोहिते, राजश्री घोरपडे, जयप्रकाश चमणकर, जयवंत दिपनाईक, दाजी धुरी, समृध्दी पेडणेकर, वसंत मोहिते, रमेश पिंगुळकर, सावळाराम कांबळी यांनी आपल्या मनोगतामध्ये मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. तर संभाजी लोहार (कोल्हापूर), श्रीधर शेवडे, अनिल भोकरे, सुधर्म गिरप यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
कर्मावर विश्वास ठेवून, पणजोबांचा ज्ञानाचा वसा घेऊन प्रामाणिकपणे शिक्षण व शिस्त यांची योग्य सांगड घालत विद्यार्थ्यांना सतत जागृत ठेवले. त्यांच्यातील कलागुणांना योग्य न्याय व संधी प्राप्त करून देण्याचा सतत प्रयत्न केला. या माझ्या कार्यात मला आजी-माजी संस्था कार्यकारिणी पदाधिका-यांचे अनमोल सहकार्य लाभले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत या शाळा संस्थेचा मोलाचा वाटा आहे. हे मी कधीच विसरणार नाही असे सत्काराला उत्तर देताना वर्षा मोहिते म्हणाल्या.
वर्षा मोहिते व कुटूंबियांनी सर्व मान्यवरांना देवीची मूर्ती दिली आणि संस्थेस रोख ११ हजारांची देणगी दिली. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. तर संस्था सचिव रमेश नरसुले यांनी आभार मानले.