*देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर*

*देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल मधील कु. आर्या अतुल राणे आणि कु. अपूर्वा विश्वेश गोगटे या दोन विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत आयोजित केलेल्या इसरो अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. दि. १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीमध्ये हे विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांनी विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, रोहिणी २०० उपग्रहाचे प्रक्षेपण होताना त्यांनी पाहिले, भारतातील त्या ठिकाणी असलेल्या वैज्ञानिकांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अनुभव घेतले. त्यांच्याशी संवाद साधला. विविध रॉकेट्सचे मॉडेल्स या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली.
या दोन विद्यार्थिनींचे शाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या पालकांचे देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी या दोन्ही विद्यार्थिनींनी या अभ्यास दौऱ्यातील घेतलेले अनुभव कथन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन व आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर यांनी केले. मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!