*कोंकण एक्सप्रेस*
*प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे बेकारदेशीर काम तात्काळ बंद करा!*
*शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांची मागणी*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील सर्वांसाठी घरे या प्रकल्पाबाबत केंद्रीय एस. के. खंडेलवाल समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे ९५ लाख दंड केलेला असताना व मागील काम डीमालीश करायचे होते. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता प्रकल्पांचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. ते बेकारदेशीर काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याकडे केली आहे.
साळसकर म्हणतात, थर्ड पार्टी क्वालीटी मॉनिटरींग रीपोर्ट २८ एप्रिल २०२२ योजनेंतर्गत जामसंडे येथे जो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्या प्रकल्पाला केंद्रीय एस. के. खंडेलवाल समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे ९५ लाख दंड भरुन घेण्यात आला आहे का? असे असतानाच कोणत्याही प्रकारचा बदल न करता प्रकल्पांचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. ते तात्काळ बंद करण्यात यावे. मागील ठेकेदाराने केलेले काम डीमालीश करुन सूचविलेला दंड वसूल करून मागील ठेकेदार यांना काळया यादित टाकून नवीन निवीदा सादर करुन सूचविलेला दंड वसूल करून काम करावे. असे असताना काम चालू केले आहे ते तात्काळ बंद करावे.
कोर्ले सातार्डी धरणावरुन देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात ३१ डिसेंबर २०२४ मासीक सभेच्या अजेंड्या प्रमाणे ठराव क्र. १३ नगरसेवकांना देण्यात आलेला इतिवृत्तांत व माहीतीच्या अधिकारात मागवीण्यात आलेला इतिवृत्तांत यात ठराव क्र. १३ सूचक अनुमोदकसहीत ठराव बदलण्यात आला असून याबाबत आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये ? नगरपंचायत अधीनियमाप्रमाणे एकदा घेतलेला ठराव ९० दिवसांच्या आत बदलता येत नाही तरीही आपण ३१ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेला ठराव पुनःश्च ३० जानेवारी २०२५ च्या मासीक सभेत घेण्यात आला आहे. याबाबतही सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील शहरवासीयांना पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यात इतर सात गावातील पोंभुर्ले गावकरीता २६ लाख ११ हजार ८००, बुरंबावडे ९७ लाख ७६ हजार १००, उंडील १ कोटी ८७ लाख ८ हजार ९००, विठलादेवी ७८ लाख ७३ हजार २००, वाघीवरे ७९ लाख ८१ हजार ९००, फणसगाव ९६ लाख 6 हजार ३००, कुणकवण ५१ लाख ६१ हजार ६०० जलजीवन मिशन अंतर्गत निधी मंजूर असून ७० ते ८० टक्के कामे पूर्ण झालेली असून देवगड जामसंडे शहरवासीयांना राबविण्यात येणाऱ्या नळयोजनेवर त्या गावांना परवानगी देण्याचा ठराव घेण्याचा अट्टाहास कशाकरीता? तो ठराव तात्काळ रदद करण्यात यावा. तसेच पीएमसी बदल करण्याचा जो अटटाहास आहे या प्रोसेसमध्ये प्रकल्पास विलंब होवून शहरवासीयांना राबवीण्यात येणारी योजना विलंबाने कार्यरत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.