*आशा म्हणजे आरोग्याचा कणा*

*आशा म्हणजे आरोग्याचा कणा*

*कोंकण एक्सप्रेस*

*आशा म्हणजे आरोग्याचा कणा*

*गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांचे प्रतिपादन*

*जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आशा दिन कार्यक्रम संपन्न*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

आशा म्हणजे आरोग्याचा कणा असुन आशांनी आपल्या कामातुन आरोग्य विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम करत आहे. नागरिक आणि शासनामधील त्या महत्त्वाचा दुवा ठरल्या आहेत. अशा या आशा स्वयंसेविकांनी कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालुन सेवा बजावली आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी केले.
जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आशा दिवस गटविकास अधिकारी देवगड श्रीम. वृक्षाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील व रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी देवगड श्रीम. वृक्षाली यादव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, जिल्हा समन्वयक वृषाली चेंदवणकर, DCM गोरख राठोड, आरोग्य कर्मचारी मदन मसके, बाबुराव वरक, स्वप्निल झोरे, सागर जाधव, विनायक सांगळे, पाककला परीक्षक श्रृती पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब मँगो सिटी देवगड अध्यक्ष मनस्वी घारे, जिल्हा समन्वयक वृषाली चेंदवणकर, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, आशा स्वंयसेविका स्वाती गांवकर, गटप्रवर्तक साक्षी खानविलकर यांनी मनोगत व्यक्त करत आशां स्वयंसेविकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर आरोग्य विषयक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून माहे एप्रिल २०२५ ते माहे फेब्रुवारी २०२५ या अकरा महीनाच्या कालावधीत उत्कृष्ट कामासोबतच राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमात मोलाचे कार्य केलेल्या आशां स्वंयसेविकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आशा स्वंयसेविका अंकिता अरविंद कुळकर (प्रा. आरोग्य केंद्र पडेल) यांनी सात कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले, तर द्वितीय क्रमांक आशा स्वंयसेविका निलिमा नागेश सारंग (इळये प्रा. आरोग्य केंद्र) यांनी तीन कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले तर तृतीय क्रमांक आशा स्वंयसेविका समिक्षा संतोष पेडणेकर (उपकेंद्र सौंदाळे गाव वाडाकेरपोई) यांनी तीन कुटुंब शस्त्रक्रिया प्रवृत्त केले तर गटप्रवर्तकांमध्ये प्रथम क्रमांक गटप्रवर्तक साक्षी गणेश खानविलकर (प्रा .आ .केंद्र पडेल) यांनी २१ शस्त्रक्रिया प्रवृत्त केले. या विजेत्या आशां स्वंयसेविकांचा व गटप्रवर्तकांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!