*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांची नागपुर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त म्हणून पदान्नतीने बदली*
*विविधांगी विकास कामांबरोबरच शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविल्याची मिळाली पोचपावती*
*वेंगुर्ले (प्रतिनिधी)- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ले नगरपरीषदेच्या सुमारे सव्वा दोन वर्षे कालावधीत स्वच्छतेत नंबर वन ठरलेल्या आणि स्वच्छतेची जिल्हा, राज्य, कोकण विभाग व देशात बक्षीसे पटकाविलेल्या वेंगुर्ला नगरपरीषदेचे स्वच्छतेत सातत्य ठेवणारे तसेच शासनाच्या माझी वसुधरा या योजनेचे पुरेपुर १०० टक्के उपक्रम राबवून तसेच शहराचे सौदर्यकरण करून नगरपरीषदेस बक्षीस मिळवून देण्यासाठी यशस्वी काम करणारे वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची शासनाच्या वरीष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांची नागपूर महानगरपालिकेवर पदोन्नतीने सहाय्यक आयुक्त गट अ या पदावर नियुक्तीने बदली करण्यात आली आहे.
वेंगुर्ले नगरपरीषदेवर प्रशासन असतानाही आपल्या सव्वादोन महिनांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासाची धुरा यशस्वी सांभाळत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी शहर सौंदरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकासह १५ कोटीचे बक्षीस, माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये कोकण विभागात प्रथम (१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या), GFC १ स्टार मानांक प्राप्त, ODF++ मानांक प्राप्त, माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये कोकण विभागात प्रथम आल्याने ७५ लाखाचे बक्षीस (१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या), अशी बक्षीसे पटकावत वेंगुर्ले नगरपरीषदेच्या शिरपेचात नावलौकीकचा तुरा रोवला.
शासनाच्या नगरपरीषदांसाठी आलेल्या परीपत्रकांनुसार प्लॅस्टीक मुक्तीसाठी विशेष मोहिम राबवून १०० टक्के प्लॅस्टीक मुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न केले. यात प्लॅस्टीक मुक्तीसाठी स्पेशल पथके तयार करून अकस्मित दुकानांची तपासणी करत दंडात्मक कारवाई सुध्दा केली. माझी माझी वसुंधरा जनजागृती अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन केंद्रात मियावाकी वन व शिल्पाकृती स्थळ उभारण्यात आले आहे. वसुधरा बचाव अंतर्गत शहरात शासकिय जागेत 500 देशी विविध प्रजातीच्या झाडांची लागवड, शहरी सौदर्यकरणांत शहरातील पुलांवर कुंड्यांच्या माध्यमातून फुलझाडांची लागवड, पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे सज्ज केली. शहरात तीन गार्डन मध्ये लहान मुलांसह मोठ्या माणसांना व्यायाम करता यावा यासाठी व्यायामाची साहित्ये तसेच विविध फुलझाडांची या गार्डनची शोभा वाढविली. शहरांत भटक्या कुत्रांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरणाचा उपक्रमही राबविला. शहरात मांडवी खाडी किनारी असलेल्या कांदळवन भागात स्वच्छता मोहित राबवत त्याबाबत जनजागृती केली. शहरातील पिण्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले. तसेच भटक्या मोकाट जनावरांसाठी सुध्दा उपाय योजना राबविल्या. शहरात पर्यटन व्यवसाय वाढावा. पर्यटक वाढावेत आणि स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार मिळावा या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. तसेच निरूपयोगी वस्तूंचा पुर्नवापर या माध्यमातून स्पर्धात्मक आयोजन केल्याने वेंगुर्ले वासियांतील अंगीभुत कलागुणांना वाव देत प्रोत्साहन दिले. वेंगुर्ले नगर परिषद कार्यालयाच्या ठिकाणी आर.आर.आर. म्हणजे रेड्युस, रियुज, रिसायकल केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबांना विविध प्रकारच्या वस्तू मोफत मिळतात.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कार्यालयानजीक दुचाकी व चारचाकी यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या सहकार्याने भिंती, कंपाउंड यांचे शहरातील संस्कृतीशी निगडीत विविध चित्रे, कवींच्या कविता, वसुंधरेचे जतनासाठी पशु/पक्षी, फुलंझाडे यांची चित्रे रेखाटली गेली. हे सर्व केल्याने वेंगुर्ले शहर पर्यटन दृष्ट्या सजवण्याचे काम श्री. कंकाळ यांनी केले आहे.
वेंगुर्ले शहरातील स्वच्छ भारत झिरो वेस्ट पर्यटन स्थळांसह सौदर्यीकरण, माझी वसुंधरा अंतर्गत केलेली कामे व पर्यटन स्थळांचे लक्षवेधी सुशोभिकरण पहाण्यासाठी देशी-विदेशी टीम खास भेटी देत आहेत. देशास व जगात विकासाचे उज्वल माँडेल वेंगुर्ले शहर ठरु शकेल असा विकास मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी आपल्या कालावधीत केल्याचे भेटी देणाऱ्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यांनी वेंगुर्ले नगरपरीषदेच्या कार्यकाळांत केलेल्या विविध स्वरूपाच्या कामात स्वच्छतेतून कचऱ्यापासून बनविलेल्या साधेखत, गांडुळखत, कोळसाकांडी. तसेच विघटन न होणारा कचरा यांची विक्री या माध्यमातून नगरपरीषदेस लाखों रूपयांचे उत्पन्न मिळवून दिलेले आहे. याबरोबरच अत्याधुनिक व्यायाम शाळा, कॅम्प येथील क्रिडा मैदान सुसज्ज, जलतरण तलाव व अग्निशमन केंद्र नुतनीकरणाने सुसज्ज, सुसज्ज असे बँ.नाथ पै समुदाय केंद्र, कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात विविधांगी कार्यक्रम सुरू केल्याने तिथे नाटके व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत. त्यामुळे नगपरीषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत्र सुरू झालेले आहे.