*कोंकण एक्सप्रेस*
*बाळकृष्ण जाधव तेजस्वी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.*.
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेतृत्व,सिंपन प्रतिष्ठान मुंबई सिंधुदुर्ग’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांना तेजस्वी फाऊंडेशन ठाणे या संस्थेच्यावतीने अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय तेजस्वी समाजभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
ठाणे येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात तेजस्वी फाऊंडेशनच्या फाऊंडर प्रा. प्रज्ञा पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.तेजस्वी फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. बाळकृष्ण जाधव हे वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावचे सुपत्र असून वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे माजी सरचिटणीस म्हणून त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रेन्मार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निलेश दिक्षित यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. त्यांना तेजस्वी समाजभूषण पुरस्कार मिळाल्यांने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.