*प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांची मालवण लायन्स क्लबला भेट*

*प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांची मालवण लायन्स क्लबला भेट*

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांची मालवण लायन्स क्लबला भेट*

*मालवण (प्रतिनिधी)*

लायन्स क्लबचे 323 D 1 चे प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांनी मालवण लायन्स क्लबला भेट देत लायन्स क्लबच्या कार्याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले यावेळी ॲड. एम. के. पाटील यांनी लायन्स क्लबचे पदाधिकारी तसेच सदस्य यांच्याशी चर्चा करत मार्गदर्शन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात ग्लोबल रक्तदाते समूहाचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लायन्स क्लब मध्ये १० वर्ष पूर्ण झालेल्या मेघश्याम शंकरदास व ३५ वर्षे पूर्ण झालेल्या दत्तात्रय रेवंडकर यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तर कॅबिनेट ऑफिसर गणेश प्रभुलकर आणि झोन चेअरमन विश्वास गावकर यांना विशेष पिन देण्यात आली तर मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी सेक्रेटरी फॅनी फर्नाडिस खजिनदार पल्लवी खानोलकर यानी लायन्स क्लब मध्ये केलेल्या  उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!