हास्यकल्लोळ स्पर्धेत गावडेवाडी ग्रुप विजेता

हास्यकल्लोळ स्पर्धेत गावडेवाडी ग्रुप विजेता

*कोंकण एक्सप्रेस*

*हास्यकल्लोळ स्पर्धेत गावडेवाडी ग्रुप विजेता*

*मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण : स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांची गर्दी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिमगोत्सवानिमित्त कलमठ बाजारपेठ येथील श्री देव काशीकलेश्वर मांडावर आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत प्रथम क्रमांक गावडेवाडी ग्रुपने पटकाविला. द्वितीय क्रमांक अस्सल मालवणी क्रिएशन तर तृतीय क्रमांक गोरक्षणाथ मित्रमंडळाने पटकाविला. दरम्यान, ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांची मांडावर गर्दी झाली होती.
या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले होते. या संघांनी सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सोंगे सादर केली. परीक्षण सुशील डवर व शेखर गवस यांनी केले. स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यात विजेत्यांना मान्यवरांच्या रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी संघांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, रामदास उर्फ रामू विखाळे, विनोद कोरगावकर, तनोज कळसुलकर, अनंत हजारे, गिरीश धुमाळे, महेश लाड, अनिल मेस्त्री, महेश मेस्त्री, बाबू कोरगावकर, आबा कोरगावकर, विनय खोचरे, संतोष हजारे, आबा मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, बाबू नारकर, प्रथमेश मठकर, चेतन मुंज, प्रद्युम मुंज, चेतन अंधारी, प्रथमेश धुमाळे आदी उपस्थित होते.
फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!