*कोंकण एक्सप्रेस*
*२८ मार्च २०२५ रोजी स्व. दिपक गुरव यांचा चतुर्थ स्मृतिदिन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
साळिस्ते येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांचा चतुर्थ स्मृतिदिन २८ मार्च २०२५ रोजी केंद्रशाळा साळिस्ते नंबर.१ येथे सामाजिक, शैक्षणिक, व शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून व स्व. दिपक गुरव यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे कणकवली, वैभववाडी, देवगड उपविभागाचे सामाजिक कार्यकर्ते ओमकार गुरव, संतोष पाष्टे, अशोक जगताप, सचिन लवेकर, सुधीर भरडे यांनी केलेले आहे.