मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर बेकायदा जमाव गुन्हा दाखल…

मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर बेकायदा जमाव गुन्हा दाखल…

*कोकण Express*

*मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर बेकायदा जमाव गुन्हा दाखल…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मनाई आदेशाचा भंग करुन आमदार नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर बेकायदा जमाव केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात युवा सेना जिल्हाध्यक्ष गितेश कडू, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, ललीत घाडीगावकर, सचिन पवार, कीरण वर्धन, वैभव माळकर, निसार शेख आदींचा समावेश आहे.

युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांच्या विरोधात राणेंनी वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या विरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन मनाई आदेश डावलून करण्यात आले, तसेच कोविडच्या काळात त्या ठीकाणी बेकायदा जमाव केल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानुसार संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!