*कोंकण एक्सप्रेस*
*वृक्ष हीच खरी संपत्ती श्रीकृष्ण परीट यांचे मार्गदर्शन*
*कोळोशी-हडपिड येथे जागतिक वन दिनानिमित्त वृक्षलागवड व पर्यावरण जनजागृती उपक्रम*
*शिरगाव | संतोष साळसकर*
“वृक्षलागवड ही काळाची गरज असून, जैवविविधतेचे संवर्धन केल्यास भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. वृक्ष हीच खरी संपत्ती आहे, ती जपली पाहिजे,” असा प्रेरणादायी संदेश देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी कोळोशी- हडपिड येथे दिला.
जागतिक वन दिनानिमित्त माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिड येथे वृक्षलागवड व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण परीट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम आणि संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
यानंतर शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक आश्विनी गर्जे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमावेळी वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक रामदास घुगे, मुख्याध्यापक आश्विनी गर्जे , शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालक अजित थोरबोले आदी मान्यवर उपस्थित होते.