*कोंकण एक्सप्रेस*
*पी एम श्री योजनेअंतर्गत पी एम श्री विद्यामंदिर वैभववाडी येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्यावतीने आरोग्य शिबिर*
*वैभववाडी संजय शेळके*
पी एम श्री योजनेअंतर्गत पी एम श्री विद्यामंदिर वैभववाडी येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगुळवाडी संस्थेचे संचालक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शेळके डॉ राजहंस मॅडम डॉ अनिरुद्ध मुद्राळे डॉ प्राची जाधव मुख्याध्यापक दिनकर केळकर दर्शना सावंत व्यवस्थापन समितीचे सदस्य राजू जाधव, कैलास पवार तुषार शिंगाडे ऋतुजा कोरलेकर आदी उपस्थित होते.
श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी च्या वतीने पीएम श्री दत्त विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांची उंची वजन अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या व विद्यार्थ्यांना औषधे पुरवण्यात आली.