*कोकण Express*
*पटकीदेवी मंदिर ते नागवे करंजे रोड चे डांबरीकरणसाठी 39 लाख मंजूर*
*आमदार नितेश राणेंच्या शिफारशी मुळे भरीव विकासनिधी*
*माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरसेविका कविता राणे यांचा पाठपुरावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील पटकीदेवी मंदिर ते शहर हद्दीतील नागवे करंजे रोड च्या डांबरीकरण व मजबुतीकरण साठी आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार बजेट निधीमधून 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत. भरीव विकासनिधी मंजूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरसेविका कविता राणे, शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई यांनी आमदार नितेश राणेंचे आभार मानले.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. हा रस्ता खड्डेमय झाला असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास होत होता. माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान स्थानिक नगरसेविका कविता राणे यांनी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.राणे दाम्पत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार बजेट निधीमधून 39 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासोबतच रस्त्यालगत काँक्रीट गटारही बांधण्यात येणार आहे.