*कोंकण एक्सप्रेस*
*रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे ३०, ३१ रोजी कार्यक्रम*
*मालवण : (प्रतिनिधी)*
मालवण सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड येथे रामेश्वर मांड मित्रमंडळ तर्फे गुढीपाडव्यानिमित्त दि. ३० व ३१ मार्च रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त ३० रोजी सकाळी ८ वा. लघुरुद्र, सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ व. सातेरी मंडळ, कांदळगावचे भजन, ६.३० वा. महापुरुष मंडळ, माड्याचीवाडीचे भजन, रात्री ८ वा. लिंग माऊली मंडळ, सांताक्रूझ-मुंबईचे भजन होईल. ३१ रोजी रात्री ८ वा. भंडारी हायस्कूल हॉलसमोर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘जया एकादशी’ नाटक होईल. सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामेश्वर मांड मित्रमंडळाने केले आहे.