*आमदार निलेश राणे यांचे पत्र अन् नेरूर वाघचौडी येथील तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण….*

*आमदार निलेश राणे यांचे पत्र अन् नेरूर वाघचौडी येथील तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण….*

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेश राणे यांचे पत्र अन् नेरूर वाघचौडी येथील तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण….*

*कुडाळ : प्रतिनिधि*

सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते. परंतु काही कारणास्तव सदर काम गेली तीन वर्षं रखडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे वाघचौडी मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्यात न झाल्याने गाडी चालवताना मोठी समस्या निर्माण होत होती.

ग्रामस्थ निवेदन दिले मात्र सदर रस्ता मंजूर असुनही होत नव्हता. ही बाब ग्रामस्थांच्या वतीने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या कानावर विषय घातला. आमदार यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व गटविकास अधिकारी कुडाळ यांना लेखी पत्र देत सदर रस्ता अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे करण्यात यावा असा आदेश काढला व रस्ता पुर्ण झाला. राखडलेला रस्ता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण झाल्याने नेरुर वाघचौडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. आमदार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेवून ही आभार मानण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!